PostImage

सुपर फास्ट बातमी

July 18, 2024   

PostImage

गडचिरोली पोलिसांच्या कारवाईत १२ माओवादी ठार; मुख्यमंत्र्यांकडून गडचिरोली पोलिसांचे विशेष …


 

गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त करण्याचा निर्धार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

मुंबई, दि. १७: महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेजवळील वांडोली गावात गडचिरोली पोलिसांनी केलेल्या कारवाईत १२ माओवादी ठार झाले असून घटनास्थळावरून पोलिसांनी स्वयंचलित शस्त्रे जप्त केली आहेत. या यशस्वी कारवाईबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली पोलिसांचे विशेष अभिनंदन केले आहे.  

 

आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास उपविभागीय पोलिस अधिकारी (ऑपरेशन्स) यांच्या नेतृत्वाखाली ७ सी ६०पथकांनी विशेष ऑपरेशन सुरू केले. वांडोली गावाजवळ १२-१५ नक्षलवादी तळ ठोकून असल्याचे त्यांना माहिती मिळाली होती. या कारवाई दरम्यान गोळीबार सुमारे ६ तासांहून अधिक काळ सुरू होता. गडचिरोली पोलिसांनी केलेल्या कारवाईत १२ माओवाद्यांना ठार करण्यात यश मिळाले. यावेळी तीन एके ४७,२ INSAS, १ कार्बाइन आणि १ एसेलआर अशी ७ स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आली आहे.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली पोलिसांनी केलेल्या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक, पोलिस उपमहानिरीक्षक (गडचिरोली परिक्षेत्र), पोलिस महानिरीक्षक (नक्षल विरोधी अभियान) आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी सर्व सहभागी जवानांच्या शौर्याचे कौतुक करून त्यांनाही शुभेच्छा दिल्या.

 

गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त करण्याचा निर्धार- मुख्यमंत्री

 

"ही कारवाई गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी हालचालींवर निर्णायक आघात ठरणारी असून विकासाला प्राधान्य देऊन हिंसाचाराला ठाम विरोध करणे, असे आमचे धोरण असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. गडचिरोली जिल्हा संपूर्णपणे नक्षलमुक्त करण्याचा आमचा निर्धार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

 

पोलिस दलाच्या या अतुलनीय कामगिरीमुळे परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक भक्कम होणार असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढण्यास मदत होणार असल्याची त्यांनी म्हटले आहे.

 

जवानांना ५१ लाख रुपयांचे विशेष बक्षीस

 

उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कारवाईत सहभागी असलेल्या जवानांना ५१ लाख रुपयांचे विशेष बक्षीस जाहीर केले आहे.


PostImage

Nikhil Alam

March 19, 2024   

PostImage

गडचिरोली में 36 लाख के इनामी चार नक्षली पोलीस मुठभेड …


महाराष्ट्र के नक्षल प्रभावित गडचिरोली जिल्हे मे पोलीस के साथ हुई मुठभेद मे चार नक्षली मारे गये है l पोलीस ने इस संबंध में मंगलवार को जानकर देते हुए बताया की मारे गये चारो दुर्गांत नक्षली ओपन 36 लाख रुपये का सामूहिक इनाम था l

नक्षलीयो के  खिलाफ पोलीस को मिली बडी कामयाबी के बारे मे बात करे हुए गडचिरोली के पोलीस अधीक्षक निलोत्पल मे बताया की सोमवार दोपहर पोलीस को सूचना मिली की कुछ नक्षली आगामी लोकसभा चुनाव के लिये लागू आदर्श आचारसंहिता के बीच विध्वंसक गतिविधियो को अंजाम देने के उद्देश से प्राणहिता नदी पार करके पडोसी राज्य तेलंगणा से गडचिरोली मे प्रवेश कर गये है l ही सूचना के मिलने के बाद गडचिरोली पोलीस की एक विशेष लढाकू एकाई C-60 और केंद्रीय रिजर्व पोलीस बल की त्वरित कार्यवाही टीम की काही टीम कोसंबंधी क्षेत्र में तलासी के लिये भेज दि गई l

पोलीस अधिकारी ने कहा की जब C- 60 युनिट की एक टीम मंगळवार सुबह रेपणपल्ली के पास कोलामरका पहाडो मे तलाश ले रही थी, तब नक्षलयोन ने उन पर अंदाधुंद गोळीबार की, दिस पर सुरक्षा कर्मी ने जवाबी कारवाई की l

गोलीबार रुकने के बाद इलाका की तलाशी ली गई और चार ऐसे नक्षलीय के शव मिले, दिन के सिर पर 36 लाख रुपये का सामूहिक नगद इनाम था l अधिकारी ने बताया की मारे गये नक्षलीयो के पास से एक AK- 47 बंदूक, एक कारबईन, दो देशी पिस्तोल, नक्षली साहित्यावर अन्य सामान भी बरामात किया गया l पोलीस ने कहा की मृत नक्षलीयो की पहचान वर्गीस, मगतू, दोनो अलग अलग नक्षली समिती ओके सचिव और प्लाटून सदस्य कुरसग राजू और कुडी मेटा व्यंकटेश के रूप में की गई है l